सुमन काळे मृत्यू प्रकरणी आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

May 17, 2011 8:00 AM0 commentsViews: 2

17 मे

2007 मध्ये घडलेल्या सुमन काळे मृत्यू प्रकरणातील चार आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सीआयडीने या आरोपींसाठी 14 दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. 2007 मध्ये सुमन काळे या महिलेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. पोलीस इन्सपेक्टर देविदास सोनवणे, पीआय तुकाराम वाहिले, सेवा निवृत्त कॉन्स्टेबल शिवाजी सुदि्रक, हेड कॉन्स्टेबल दीपक खराळ हे या प्रकरणातील आरोपी आहेत. सीआयडीने त्यांना आज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार आहे.

close