यंदा म्हाडाच्या घरांसाठी कमी प्रतिसाद

May 17, 2011 12:11 PM0 commentsViews: 1

17 मे

मुंबईत म्हाडाने घरांसाठी काढलेल्या लॉटरीसाठी यावेळी कमी प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी म्हाडाने चार हजार चौतीस घरांसाठी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास 27 एप्रीलला सुरवात झाली होती. ऑनलाईन अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता.

म्हाडाकडे ऑनलाईन 1 लाख 82 हजार 28 अर्जदारांनी अर्ज भरले आहेत. तर 85 हजार आठशे अठ्याण्णव अर्ज अक्सीस बँकेत जमा केले आहेत. म्हाडाने घरांसाठी गेल्यावर्षी काढलेल्या लॉटरीसाठी साडे चार लाख अर्ज जमा झाले होते.

त्यामुळे या वर्षी आलेल्या अर्जदारांच्या कमी संख्येमुळे म्हाडाच्या घरांना लोकांनी कमी प्रतीसाद दिल्याचे समोर आले आहे. या वर्षी म्हाडाने मुंबईत 4034 घर विक्रीसाठी उपल्बध केली आहेत. या घरांसाठी ऑनलाईन भरलेले अर्ज, ऍक्सीस बँकेत जमा करण्यासाठी 19 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

close