चोपडा साखर कारखान्याने कामगारांचा पगार थकवला

May 17, 2011 3:19 PM0 commentsViews: 7

17 मे

जळगावच्या चोपडा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचा 6 महिन्याचा पगार थकला आहे. हा कारखाना सुरु असून यंदाच्या हंगामात 2 लाख 65 हजार टन गाळप करुनही कामगारांचा पगार थकला आहे.

पण कारखाना आर्थिक अडचणीत असला तरी कामगारांचा पगार लवकर देणार असल्याचे व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. जळगांव जिल्ह्यात 5 साखर कारखाने बंद आहेत.

पण चोपडा सहकारी साखर कारखाना सुरू आहे. ऑक्टोबर 2010 पासून कायमस्वरुपी 249 आणि कामगारांना कारखान्याने पगारंच दिला नाही. यंदाच्या हंगामात झालेल्या विक्रमी गाळपानंतर पगार मिळतील असं व्यवस्थापनाने आश्वासन दिल्याचे कामगारांचे म्हणणं आहे.

close