औरंगाबादमध्ये शाळेला लागलेल्या आगीत सर्व पुस्तकांची राख रांगोळी

May 17, 2011 1:00 PM0 commentsViews: 6

17 मे

औरंगाबादच्या चेलीपुरा हायस्कूलमध्ये लागलेल्या आगीत सर्व शिक्षा अभियानातील पुस्तकांची राख रांगोळी झाली आहे. विशेष म्हणजे ही पुस्तके शिल्लक असतानाही औरंगाबाद महापालिकेच्या शिक्षण अधिकारी ज्ञानदा कुलकर्णी यांनी त्याची माहिती पाठ्यपुस्तक मंडळाला कळविली नव्हती.

त्यामुळे महापालिकेच्या सभेत त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे या आगीविषयी संशय व्यक्त करण्यात येतोय. ही शिल्लक पुस्तकं अक्षरश: कचर्‍याच्या ढिगात पडून होती.

याप्रकरणी महापालिकेने एका कंत्राटी कर्मचार्‍याला निलंंबित करून ज्ञानदा कुलकर्णी यांची चौकशी सुरू केली होती. या कचर्‍यात पडलेल्या पुस्तकांविषयी प्रसिध्दी माध्यमांनी आवाज उठवताच त्याचे पडसाद महापालिकेच्या सभेतही उमटले होते.

त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीतून अधिकार्‍यांना वाचविण्यासाठी आग लावली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. पुस्तकांसोबत कागदपत्रेही जळाल्याची प्राथमिक माहिती आयबीएन लोकमतकडे आली आहे.

close