सरकारमुळे शेतकरी करता दुप्पट भावाने बियाण खरेदी

May 17, 2011 3:26 PM0 commentsViews: 1

17 मे

बीटी कॉटनच्या बियाणाबाबत राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे शेतकर्‍यांना काळ्या बाजारातून बियाण खरेदी करावे लागत आहे. सुरुवातीला या बियाणाचे दर जाहीर करण्यात सरकारने उशीर केला.

शिवसेनेचे धुळ्याचे आमदार शरद पाटील यांनी आमरण उपोषण केल्यावर गेल्या वर्षीप्रमाणेच दर राहातील अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र, प्रत्यक्षात इतर राज्यांच्या उत्पादनाचे कारण सांगून हे दर 650 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

प्रत्यक्षात या दरातही हे बियाण बाजारात प्रत्यक्षात उपलब्ध न झाल्याने शेतकर्‍यांवर 1200 रुपये दराने काळ्याबाजारातून हे बियाण खरेदी करण्याची वेळ आली आहे. कृषिमंत्री मात्र सारं काही अलबेल असल्याची बतावणी करत आहेत.

close