विमानाने प्रवासकरुन चोरी करणार चोर अटकेत

May 17, 2011 1:12 PM0 commentsViews: 5

17 मे

पुण्यातील लखपती चोर मधुकर मोहनदास प्रभाकरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. घरफोडी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. मधुकरवर घरफोडीचे तब्बल 110 गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली.

तर अनेक गुन्ह्यात तो निर्दोषही सुटला आहे. त्याला आत्तापर्यंत पुण्यातून तीनवेळा, तर मुंबईतून एकदा तडीपार करण्यात आलंय. वयाच्या 14 व्या वर्षांपासून तो घरफोड्या करतोय. सध्या 53 वर्षांचा असलेल्या मधुकरचा पुण्यात अलिशान बंगला आहे.

शिवाय त्याच्या मालकीचं पॉश हॉटेलही आहे. तसेच त्याने एक मंदिरही बांधलं आहे. मुंबईत नर्गिस दत्त यांच्या घरी चोरी करताना तो सापडला होता.

पुण्यातून मुंबईला विमानाने जाऊन टॅक्सी पकडून चोरी करण्याच्या ठिकाणी रेकी करतो असं म्हटलं जातं. 2010 साली पुन्हा त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव देण्यात आला होता, पण तो फेटाळण्यात आला. पण आता मधुकर मोहनदास प्रभाकरला मुंबई पोलिसांनी अटक केलीय.

close