जेष्ठ शाहीर भिष्णूरकर कालवश

May 17, 2011 4:08 PM0 commentsViews: 11

17 मे

आपल्या पहाडी आवाजातील शाहिरीनं संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे शाहीर योगेश उर्फ दिवाकर नारायण भिष्णूरकर यांचं काल वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात त्यांचं निधन झालं. त्याच्या पश्चात दोन मुलं, एक विवाहीत मुलगी आणि पत्नी आहे.

शाहीर योगेश हे मुळचे अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जीचे. महाराष्ट्र शाहीर परिषदेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचे गैरसमज दूर करुन त्यांच्या कार्याची माहिती त्यांनी पसरवली.

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची किर्ती त्यांनी हिंदी पोवाड्यांद्वारे देशभर पोचवली. महिलांनी शाहिरी करावी यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. वाकड येथील कस्पटेवस्ती स्मशानभूमीत आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

close