वेध शेअरबाजाराचा

November 11, 2008 5:53 AM0 commentsViews: 4

11 नोव्हेंबर, मुंबईदिवसाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही इंडेक्समध्ये साधारण दीड टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. जवळपास सगळ्याच सेक्टरमध्ये मंदीचा परिणाम दिसून आला. सेन्सेक्स 396 अंक खाली घसरून 10139 वर आला. निफ्टी इंडेक्समध्येदेखील 102 अंकांची घसरण होऊन तो 3045 वर आला. एफएमसीजी आणि हेल्थ केअर इंडेक्स सोडून सगळ्याच सेक्टरमध्ये मंदी आहे. टॉप लूजर्समध्ये स्टरलाईट इंडस्ट्री, हिंदाल्को आणि टाटा स्टील या कंपन्या आहेत. 10 नोव्हेंबरला चीननं बेल आउट पॅकेज दिल्यावर शेअरबाजारात तेजी दिसून आली होती, पण त्याचा प्रभाव आज ओसरल्याचं दिसून आलं.

close