पंजाबचं आयपीएलमध्ये आव्हान कायम

May 17, 2011 6:27 PM0 commentsViews: 7

17 मे

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या टीमने आयपीएलमधील आपलं आव्हान कायम राखलं आहे. किंग्ज इलेव्हनने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा 111 रन्सने धुव्वा उडवला.

कॅप्टन ऍडम गिलख्रिस्ट आणि शॉन मार्शने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पहिली बॅटिंग करणार्‍या किंग्ज इलेव्हनने 232 रन्सचा डोंगर उभा केला. गिलख्रस्ट आणि मार्शने 206 रन्सची हायेस्ट पार्टनरशीप केली. गिलख्रिस्टने शानदार सेंच्युरी ठोकली.

याला उत्तर देताना बंगलोर रॉयलची इनिंग अवघ्या 121 रन्सवर आटोपली. एबी डिव्हिलिअर्सनं सर्वाधिक 34 रन्स केले. पण किंग्ज इलेव्हनच्या बॉलर्ससमोर बंगलोरचे इतर बॅट्समन सपशेल फ्लॉप ठरले.

या विजयाबरोबरच किंग्जच्या प्ले ऑफमध्ये खेळण्याच्या आशा जिंवत राहिल्या आहेत. 13 मॅचमध्ये किंग्जच्या खात्यात 14 पॉईंट जमा झाले आहे.

close