कासकर घटनास्थळी नव्हता पोलिसांचा दावा

May 18, 2011 8:40 AM0 commentsViews: 5

18 मे

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. काल रात्री कासकरवर हल्ला झाला तेव्हा इक्बाल कासकर घटनास्थळी उपस्थित नव्हता असा दावा आता मुंबई पोलिसांनी केला आहे.

या हल्ल्यात इक्बाल कासकरचा बॉडीगार्ड ठार झाला. त्याला सहा गोळ्या लागल्या आहेत. पण कासकरला कोणत्याही प्रकारची सुरक्षा देणार नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. दरम्यान दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली होती. या दोघांना आज 26 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सय्यद बिलाल मुस्तफा अली आणि इंद्रलाल बहादूर खत्री असं या अटक केलेल्या दोघांचे नाव आहे.

या मधील इंदर लाल खत्री हा नेपाळचा रहिवाशी आहे आणि तो माओवादी असल्याचं सांगण्यात येतं आहे. नेपाळमध्ये गेल्या 10 वर्षापासून तो सक्रीय होता.

पण त्यानंतर त्यानं अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश केला. त्याने फक्त 50 हजार रुपयात या हल्ल्याची सुपारी घेतल्याची माहितीही सूत्रांकडून मिळतेय. इक्बाल कासकर हा मुंबईतल्या सारा-सारा प्रकरणातला आरोपी आहे. त्याच्यावर जमीन अतिक्रमणाचाही आरोप आहे. दुबईहून डिपोर्ट करुन त्याला मोकाखाली अटक करण्यात आली होती.

इक्बाल कासकर हा मुंबईतल्या सारा-सारा प्रकरणातला आरोपी आहे. त्याच्यावर जमीन अतिक्रमणाचाही आरोप आहे. दुबईहून डिपोर्ट करुन त्याला मोकाखाली अटक करण्यात आली होती.

दरम्यान मुंबईत कोणतीही गँग आता सक्रीय नाही. मुंबईत पोलिसांचे संपूर्ण नियंत्रण आहे असं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलं. आर. आर. पाटील अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

close