मोस्ट वॉन्टेड यादीतून वजहुलचे नाव वगळले

May 18, 2011 9:19 AM0 commentsViews: 4

18 मे

पाकिस्तानला दिलेल्या मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांच्या यादीत जो घोळ झाला त्याची जबाबदारी आता केंद्र सरकारने घेतली आहे. या यादीत ठाण्यातल्या एका आरोपीचं नाव असल्याचं काल आढळून आलं होतं.

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी यावर आज स्पष्टीकरण दिलंय. यादी बनवताना चूक झाली अशी कबुली त्यांनी दिली. ठाण्यातला आरोपी वजहूल कमर खान याला मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी 2010 मध्येच अटक झाली होती.

पण 50 अतिरेक्यांची यादी बनवताना मुंबई पोलिसांकडून चुकून त्याचंही नाव आलं. तसेच गुप्तचर विभागाकडूनही चूक झाली असं चिदंबरम यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सीबीआयने आज आपली वेबसाईट अपडेट केली. आणि 50 जणांच्या यादीतून वजहूल कमर खान याचं नाव काढून टाकलं आहे.

close