ऊस उत्पादक शेतकर्‍यांना अत्याधुनिक यंत्राचा दिलासा

May 18, 2011 9:25 AM0 commentsViews: 7

18 मे

राज्यात सध्या ऊसतोड मजुरांच्या टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पण या संकटावर मात करण्यासाठी अत्याधुनिक ऊसतोडणी यंत्राचा वापर करण्यात येत आहे.

यावर्षी सोलापूर जिल्हामध्ये 30 लाख टन अतिरिक्त ऊसाचे उत्पादन झाले आहे. या ऊसाच्या गाळपासाठी आधुनिक यंत्राचा आधार मिऴाल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

दुष्काळी जिल्हा म्हणून ख्याती असलेल्या सोलापूर जिल्हामध्ये दरवर्षी 90 लाख टन ऊसाचे उत्पादन होतं. गेल्यावर्षी मुबलक पाऊस पडल्याने शेतकर्‍यांनी 30 लाख टनापर्यत ऊसाचे अतिरिक्त उत्पादन घेतले आहे.

पण मजुरांच्या अभावी ऊसाचे गाळप थकले होते. या संकटातून मार्ग का़ढण्यासाठी बहुतांश साखर कारखान्यांनी ऊसतोडणी यंत्राचा आधार घेतला आहे.

close