नाट्य निर्माता संघाच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

May 18, 2011 10:24 AM0 commentsViews: 11

18 मे

मराठी रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते प्रशांत दामले यांची आता नाट्य निर्माता संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात आज झालेल्या नाट्य निर्माता संघाच्या बैठकीनंतर प्रशांत दामले यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

महत्वाचे म्हणजे नाट्य निर्माता संघाच्या नवीन अध्यक्षपदासाठी कुठल्याही प्रकारची निवडणूक न होता. प्रशांत दामले यांची बिनविरोध निवड झाली.

निर्माते सुधीर भट, लता नार्वेकर, शशिकांत शिर्सेकर, प्रदिप कबरे, वैजंयती कुलकर्णी आपटे ही निर्माती मंडळीही अध्यक्षपदासाठी उत्सुक होती. पण या सगळ्यांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे प्रशांत दामले यांचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला.

प्रशांत दामले यांची अध्यक्षपदाची निवड ही 2 वर्षांसाठी करण्यात आली आहे. याआधी निर्माते सुधीर भट हे नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष होते.

close