चेन्नईला ‘सुपर’ होण्यासाठी कोची टस्कर्सचं आव्हान

May 18, 2011 10:30 AM0 commentsViews: 6

18 मे

आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोची टस्कर्स केरलाची टीम आमने सामने येणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ही मॅच खेळवली जाणार आहे.

बंगलोर रॉयलला मागे टाकत पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थान गाठण्याची चांगली संधी चेन्नई सुपरकडे आहे. चेन्नईचे 12 मॅचमध्ये 16 पॉईंट झालेत आणि सध्या चेन्नईची टीम पॉईंटटेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे.

दुसरीकडे कोची टीमचे 13 मॅचमध्ये 12 पॉईंट झाले आहेत. पण प्ले ऑफमध्ये पोहचण्याची कोची टीमची शक्यता फारच कमी आहे.

close