रामानंद तिवारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा – जगताप

May 18, 2011 10:48 AM0 commentsViews: 4

18 मे

आदर्श सोसायटी प्रकरणी निलंबित करण्यात आलेले माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा अशी मागणी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी मंगळवारी झालेल्या आमच्या आजचा सवाल या कार्यक्रमात केली.

मंगळवारच्या आजचा सवाल या कार्यक्रमाचा आदर्श घोटाळ्यातील फायली, हार्ड डिस्क गायब होणं हा मोठ्या कारस्थानाचा भाग आहे का ? असा चर्चेचा सवाल होता. या कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सिमप्रित सिंग, माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार सहभागी झाले होते.

close