आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अध्यक्षावर पद सोडण्याचा दबाव

May 18, 2011 10:56 AM0 commentsViews: 62

18 मे

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष डॉमिनिक स्ट्रॉस- कान यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर त्यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव वाढत चालला आहे. 1945 पासून हे पद युरोपीयन व्यक्तीकडे आहे. त्यामुळे आता चिन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका देशानी कान यांनी पद सोडावे याकरीता दबाव वाढवला.

24 देशांच्या सदस्यांचे संचालक मंडळ स्ट्रॉस यांना पदावरुन हटवू शकतं. त्यामुळे स्ट्रॉस यांच्याऐवजी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे नवे अध्यक्ष कोण याची चर्चा सुरु झाली आहे.

चर्चेत असलेल्या नावांपैकी एक नाव आहे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेक सिंह अहलुवालिया यांचं. मॉटेंक सिंह यांनी याआधी आयएमएफच्या स्वंतत्र परिक्षण कार्यालयाच्या संचालकपदाची जबाबदारी पार पाडली आहे.

याशिवाय इंग्लडचे माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांच्यासह इतर देशातील काही लोकांची नावंही चर्चेत आहेत. या पदासाठी वयोमर्यादा 64 वर्षाची आहे. सध्या मॉटेंक सिंग यांच वय 67 आहे. मात्र ही अट सदस्य देशांच्या बहुमताने वगळली जाण्याची तरतूद आहे.

close