कलमाडींचा तिहारमधला मुक्काम वाढला

May 18, 2011 11:01 AM0 commentsViews: 1

18 मे

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

जामीन अर्जावर सुनावणीसाठी कलमाडी यांना आज दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने त्यांच्या कोठडीत 1 जूनपर्यंत वाढ केली.

कलमाडींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली. त्या प्रकरणावर 21 मे रोजी सुनावणी होणार आहे. कॉमनवेल्थ गेम्ससाठीच्या टाईमवॉच खरेदी कंत्राटात घोटाळा केल्याचा कलमाडींवर आरोप आहे.

close