‘आदर्श’ प्रकरणी 3 आरोपींच्या जीवाला धोका; जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

May 18, 2011 2:31 PM0 commentsViews: 2

18 मे

आदर्श सोसायटी फाईल गहाळ प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींचे जामीन अर्ज जिल्हा कोर्टाने फेटाळला आहे. या तीनही आरोपींच्या जीवाला धोका असल्याचे सांगत कोर्टाने त्यांना जामीन नाकारला आहे.

गुरुदत्त वाजपे, एन एन नार्वेकर, वामन राउळ यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. आदर्श प्रकरणाची फाईल गहाळ झाल्याप्रकरणी या 1 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

आदर्श प्रकरणाला दिवसेंदिवस कलाटणी मिळत आहे. या अगोदर महत्वाच्या फाईलतील काही पानं गहाळ होणं आणि नंतर हार्ड डिस्क गहाळ होणं.

या प्रकरणामुळे आदर्श प्रकरणातील धागेदोरे कुठ पर्यंत असू शकता याचा अंदाज लावणे कठिण आहे. आठ मे रोजी गुरुदत्त वाजपे, एन एन नार्वेकर, वामन राउळ या अधिकार्‍यांनी अटक करण्यात आली.

याच अधिकार्‍यांवर हार्ड डिस्क गायब केल्याचा संशय आहे. आणि आज कोर्टात जामीन अर्जावर या अधिकार्‍यांच्या जीवाला धोका असल्याने कोर्टाने अर्ज फेटाळून लावला आहे.

close