शेन वॉर्नला 50 हजार डॉलरचा दंड ठोठावला

May 18, 2011 11:50 AM0 commentsViews: 3

18 मेशेन वॉर्न आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय दीक्षित यांच्यातील भांडण आतातरी संपेल असं वाटतं नाही. कारण या प्रकरणात आयपीएलच्या शिस्तभंग समितीने वॉर्नला 50 हजार अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावला आहे.

खरतर वॉर्नवर एका मॅचची बंदी लादली जाईल अशी चर्चा होती. आणि तसं झालं असतं तर राजस्थानची शेवटची लीग मॅच तो खेळू शकला नसता. पण वॉर्नचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्थान आणि आयपीएलमधील त्याचे योगदान लक्षात घेऊन त्याला दंडावर सोडण्यात आलंय.

वॉर्नने हे आपलं शेवटचं आयपीएल असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. चेन्नई विरुद्धच्या मॅचनंतर वॉर्नने दीक्षित यांना वैयक्तिक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला होता. आणि नंतर दोघांमध्ये भांडण पेटलं होतं.

close