महिलेचा विनयभंग प्रकरणी वैद्यकीय अधिकार्‍याला अटक

May 18, 2011 12:21 PM0 commentsViews: 1

18 मे

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍याने एका महिलेचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन डॉ. सुहास यादव याला अटक केली आहे.

नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात या डॉक्टरकडे सोमवारी एका मेडिकल मधील महिलेनं पाण्याची बाटली मागितली असता त्याने या महिलेला शिवीगाळ केली.

त्यानंतर डॉ. यादव दारू पिऊन आला होता अशी फिर्याद महिलेनं नारायणगाव पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. यादव या घटनेनंतर फरार झाला होता त्यानंतर लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

close