मालेगाव बॉम्बस्फोटाची पाळंमुळं उत्तरप्रदेशात

November 11, 2008 6:28 AM0 commentsViews: 3

11 नोव्हेंबर, उत्तर प्रदेशमालेगाव बॉम्बस्फोटाची पाळंमुळं महाराष्ट्र,गुजरात मध्यप्रदेश पाठोपाठ उत्तरप्रदेशातंही असल्याचं आता उघड झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली असून नाशिक कोर्टानं महाराष्ट्र एटीएस पथकाला हिंदू संघटनेशी संबधित असणार्‍या एका बड्या नेत्याची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. या चौकशीसाठी एटीएसचं पथक उत्तर प्रदेशातही दाखल झालं. मात्र या चौकशीसाठी उत्तर प्रदेश पोलिसांना सहकार्य मिळत नसल्यामुळं एटीएस पथकानं कोर्टाची मदत मागीतली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशमधूनही अटक होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

close