राज्यपाल भारद्वाज यांनी केली येडियुरप्पा यांची प्रशंसा

May 18, 2011 5:11 PM0 commentsViews: 4

18 मे

कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्याला आज वेगळं वळण लागलं. कर्नाटक सरकार बरखास्तीची शिफारस करणारे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांनी यू टर्न घेतला. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची जाहीर प्रशंसा केली.

राजकीय मतभेद असले तरी येडियुरप्पा आपले चांगले मित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचवेळी पक्षपातीपणा केल्याचा आपल्यावरचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.

कालपर्यंत एकमेकांवर चिखलफेक करणारे राज्यपाल आणि मुख्यमंत्री आज कर्नाटक राज्य सेवा आयोगाच्या डायमंड ज्युबिली कार्यक्रमाच्या वेळी एकाच व्यासपीठावर आले.

यावेळी त्यांनी एकमेकांशी गप्पाही मारल्या. कर्नाटकात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट होती. येडियुरप्पा यांनी यावेळी राज्यपालांना पुष्पगुच्छही दिला.

close