लवासा प्रकरणी आदिवासींना नोटिसा

May 18, 2011 6:03 PM0 commentsViews: 5

18 मे

लवासा प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या आदिवासींच्या जमिनी परत देण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. सरकारने 17 आदिवासींना नोटिसा पाठवल्या आहे. आणि आदिवासी असल्याचे पुरावे सादर करायला सांगितले आहे.

आदिवासी असल्याचे सिद्ध झाल्यास जमीन हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आयबीएन लोकमतला दिली. आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना घेता येत नाहीत.

पण तरीही या प्रकल्पासाठी 97 आदिवासींच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत असं जनआंदोलन समितीने म्हटलं आहे. आदिवासींबरोबरच सगळ्याच 170 सीलिंगधारकांना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान आपण आदिवासींच्या जमिनी घेतलेल्या नाहीत असं स्पष्टीकरण लवासाने दिले आहे. जमिनी घेताना त्या बिगर आदिवासी नाहीत याची पाहणी करुनच त्या घेतल्या होत्या असंही लवासाने स्पष्ट केलंय.

close