पुणे महानगरपालिकेला मिळाले पूर्णवेळ आयुक्त

May 18, 2011 3:14 PM0 commentsViews: 17

18 मे

अखेर पुणे महानगरपालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले. महेश झगडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर महेश पाठक यांची नियुक्ती करण्यात आली. पाठक यांनी आज चार्ज घेतला. पावसाळा तोंडावर आला आहे.

शहरात नदी आणि नाल्यांवरच्या अतिक्रमणाचा मुद्दा गाजतोय या पार्श्वभूमीवर पाठक यांनी पहिल्याच दिवशी रामनदीची पाहणी केली. 31 मे पूर्वी नदी नाल्याच्या सफाईची कामं पूर्ण केली जातील असं आश्वासन पाठक यांनी दिलं.

महेश झगडे यांच्या बदलीचा मुद्दा गाजला होता. तसेच महपालिका निवडणुका जवळ आल्याने पाठक यांच्या समोर आव्हानही मोठी असणार आहेत.

close