गडचिरोलीत चकमक 1 जवान शहीद ; 2 नक्षलवादी ठार

May 19, 2011 9:30 AM0 commentsViews: 6

19 मे

गडचिरोली जिल्ह्यात नरगुंडा पोलीस स्टेशनवर आज सकाळी दीडशे ते दोनशे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. तर या चकमकीत दोन नक्षलवादीही ठार झाले आहेत.

घटनास्थळी पोलिसांना ए के 47 रायफलचे मॅगझीन मिळाले आहेत. सी – 60 बटालीयनचा कमांडो या चकमकीत शहीद झाला आहे. चिन्ना मेंन्टा अस या शहीद कमांडोचं नाव आहे.

दरम्यान भामरागड तालुक्यात बेजुर डोंगरावर नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये सुरू असलेली चकमक संपुष्टात आली आहे. एक तास ही चकमक सुरू होती.

यावेळी जवळपास दोन तास नक्षलवादी आणि पोलीस जवानामध्ये तूफान चकमक झाली. नक्षलवाद्यांना पोलीस जवानांनी दिलेल्या प्रत्युतरानंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले. दरम्यान पोलिसांच्या मदतीसाठी गडचिरोली मुख्यालयातून हेलिकॉप्टर रवाना करण्यात आलं होतं.

चकमक आता संपली आहे. दरम्यान आलापल्ली जवळच्या ताडगाव इथही पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याचं वृत्त आहे. आलापल्ली- भामरागड रोडवर ही चकमक सुरु आहे.

close