कलमाडींवर पैशांची अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल

May 19, 2011 9:46 AM0 commentsViews: 2

19 मे

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या सुरेश कलमाडींना आणखी एक धक्का बसला आहे. एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटने कलमाडी यांच्याविरोधात कॉमनवेल्थ गेम्समध्ये पैशांची अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तसेच पुढच्या चौकशीसाठी कलमाडींचा ताबा मिळावा अशी मागणीही ईडीने कोर्टात केली आहे. यापूर्वी ईडीने कलमाडी यांच्याविरोधात परदेशी चलनाच्या नियमांचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान सुरेश कलमाडींवर लवकरच आरोप निश्चित होणार आहेत. सीबीआयच्या चार्जशीटची एक प्रत आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली आहे. येत्या 23 मे पर्यंत सीबीआय ही चार्जशीट दाखल करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्वीस कंपनीला दिलेल्या टाईम स्कोअरिंग मशीन्सच्या कॉन्ट्रक्टमध्ये घोटाळा झाल्याचा कलमाडींवर आरोप आहे. तर काल सुरेश कलमाडी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

जामीन अर्जावर सुनावणीसाठी कलमाडी यांना दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांच्या कोठडीत 1 जूनपर्यंत वाढ केली.

close