दिल्लीत बाबा-दादा सोबत

May 19, 2011 9:54 AM0 commentsViews: 2

19 मे

दिल्लीमध्ये आज नियोजन आयोगासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांची बैठक होत आहे. 3 वाजता ही बैठक होणार आहे. राज्याच्या वार्षिक योजनेचा प्रस्ताव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोटेंकसिंग अहलुवालीया यांच्यापुढे ठेवण्यात येणार आहे.

41 हजार 500 कोटीच्या वार्षिक योजनेत आणखी 3 हजार कोटींची भर मिळवण्याचा प्रयत्न देखील राज्य सरकार करणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने गेल्या अनेक दिवसापासून एकमेकांशी अबोला धरुन बसलेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र येत आहेत.या बैठकीबरोबर दिल्लीत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांची समन्वय बैठक सुध्दा होण्याची शक्यता आहे.

close