जनता दल (यू) च्या खासदारांचे राजीनामे स्वीकारले

November 11, 2008 7:15 AM0 commentsViews: 3

11 नोव्हेंबर, दिल्लीमराठी-उत्तर भारतीय वादावरून जनता दल युनायटेड पक्षाच्या पाच खासदारांनी दिलेले राजीनामे लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी यांनी स्वीकारले आहेत. गेल्या आठवड्यात या पाच खासदरांनी हे राजीनामे दिले होते. राज ठाकरे यांच्याविरूद्ध कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ हे राजीनामे देण्यात आले आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या खासदारांनी देखील पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे दिले होते. मात्र जनता दल युनायटेडच्या खासदारांचे राजीनामे स्वीकारले गेल्याने आता लालूप्रसाद यादव यांच्यावरील दबाव वाढला आहे.

close