रजनीकांत आयसीयूमध्ये दाखल

May 19, 2011 10:16 AM0 commentsViews: 37

19 मे

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रकृतीत आता वेगाने सुधारणा होत आहे. त्यांना फक्त श्वसनाचा त्रास असल्यानंच आयसीयूमध्ये हलवण्यात आल्याचे रजनीच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे.

चेन्नईच्या रामचंद्र मेडिकल सेंटरच्या आयसीयूमध्ये रजनीकांत यांना हलवण्यात आले. ते आता उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनीही सांगितलं आहे.

त्यामुळे रजनीकांत यांच्यावर शांततेत उपचार होऊ द्या कुठल्याही अफवा पसरवू नका असं आवाहन रजनीकांतच्या पत्नी लता रजनीकांत यांनी केलं आहे.डॉक्टरांची एक टीमच रजनीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

close