राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांना 11 पुरस्कार

May 19, 2011 10:57 AM0 commentsViews: 12

19 मे

58 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यंदा मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. स्पेशल ज्युरीसह तब्बल 11 पुरस्कार मराठी चित्रपटांनी पटकावले आहे.

मी सिंधुताई सपकाळ चित्रपटाला स्पेशल ज्युरी, सर्वेत्कृष्ट पटकथा, संवाद असे एकूण चार पुरस्कार मिळाले आहे. अनंत महादेवन आणि संजय पवार यांना सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी तर संजय पवार यांना या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट संवादासाठी पुरस्कार मिळाला आहे.

सुरेश वाडकर हे याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक ठरले आहे. तर बाबू बँड बाजा या चित्रपटाने देखील राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी मोहोर उमटवली आहे. पदार्पणाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार या चित्रपटाने पटकावला आहे.

सामाजिक आशयाचा पुरस्कारही चॅम्पियन या चित्रपटाने मिळवला आहे. याच चित्रपटातील मच्छिंद्र घाटकर आणि शंतनू रांगणेकर तसेच बाबू बँड बाजा चित्रपटासाठी मच्छिंद्र घाटे सर्वोत्कृष्ट बालकलाकार ठरला आहे.

विशेष म्हणजे बाबू बँड बाजामधील भूमिकेसाठी मिताली जगतापला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर मला आई व्हायचंय हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. तर या वर्षातील सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा मान दबंग सिनेमाने पटकवला आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

1) ज्युरी अवॉर्ड – मी सिंधुताई सपकाळ 2) सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – मला आई व्हायचंय3) सामाजिक आशयाची फिल्म – चॅम्पियन – मराठी4) सर्वोत्कृष्ट पदार्पण फिल्म – बाबू बँड बाजा. मराठी सिनेमा

5) सर्वोत्कृष्ट गायक : सुरेश वाडकर 6) सर्वोत्कृष्ट बालकलाकार – शांतनू रांगणेकर – चॅम्पियन7) सर्वोत्कृष्ट बालकलाकार – मच्छिंद्र घाटकर – चॅम्पियन8) सर्वोत्कृष्ट बालकलाकार – विवेक चाबुकस्वार (बाबू बँड बाजा)9) सर्वोत्कृष्ट स्क्रीनप्ले रायटर – मी सिंधुताई सपकाळ – अनंत महादेवन आणि संजय पवार

11) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मिताली जगताप12) विक्रम गायकवाड – मेकअप – मोनेर मानूश बंगाली

close