जळगावमध्ये पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन

May 19, 2011 12:31 PM0 commentsViews: 6

19 मे

पेट्रोल दरवाढी विरोधात राज्यात आंदोलन सुरुच आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे जळगावमध्ये दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा काढण्यात आला होता.

बैलगाडी आणि घोडागाडीवर आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी दरवाढ विरोधात जोरदार घोषणा दिल्या. दरवाढ कमी झाली नाही तर सरकारी अधिरकार्‍यांना कार्यालयात जाऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे.

close