आघाडीमधील नाराजी मीडियाने पसरवली – अजित पवार

May 19, 2011 1:52 PM0 commentsViews: 1

19 मे

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कोणतीही नाराजी नाही मीडियानेच अशा बातम्या पसरवल्या असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. दिल्लीमध्ये झालेल्या नियोजन आयोगाच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकत्र आले. नियोजन आयोगासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांची बैठक झाली.

राज्याच्या वार्षिक योजनेचा प्रस्ताव नियोजन आयोगासमोर ठेवण्यात आला. 41 हजार 500 कोटीच्या वार्षिक योजनेत आणखी 3 हजार कोटींची भर मिळवण्याचा प्रयत्न देखील राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

close