मार्गारेट अल्वांवर कारवाई होणार – वीरप्पा मोईली

November 11, 2008 8:29 AM0 commentsViews: 5

11 नोव्हेंबर, दिल्लीकाँग्रेसच्या सरचिटणीस मार्गारेट अल्वा यांनी आपल्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला. कर्नाटक निवडणुकांत तिकीट-विक्री झाल्याचा आरोप अल्वा यांनी केला होता. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. त्यानंतर हे प्रकरण काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडे सोपवलं गेलं. याच दरम्यान अल्वांनी राजीनामा दिलाय. दरम्यान अल्वा यांनी पक्षशिस्त मोडली असल्यानं त्यांच्या शिस्तपालन समिती कारवाई करेल अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते वीरप्पा मोईली यांनी दिली आहे.

close