विरधवल खाडेची मलेशियन ओपन स्पर्धेत 8 पदकांची कमाई

May 19, 2011 1:00 PM0 commentsViews: 2

19 मे

आशियाई स्पर्धेत ब्रॉझ मेडल पटकावणारा भारताचा जलतरणपटू विरधवल खाडेनं आणखी एक चमकदार कामगिरी केली आहे. मलेशियन ओपन स्पर्धेत त्याने तीन गोल्ड मेडल्ससह आठ मेडल्स पटकावले आहे.

विरधवलने 50 मिटर, 100 मिटर, आणि 200 मिटर स्पर्धेत ही सुवर्ण कामगिरी केली आहे. तसेच त्याने 50 मिटर आणि 100 मिटर बटरफ्लाय स्पर्धेत सिलव्हर मेडल्स मिळवले आहे.

वैयक्तिक मेडल्स तर त्याने मिळवलेच आहेत पण त्याचबरोबर रिले स्पर्धेत तीन सिलव्हर मेडलसचाही वेध घेतला आहे. भारताच्या अश्विन मेननने पुरूषांच्या 200 मी बॅकस्ट्रोक स्पर्धेत ब्रॉंझ मेडल पटकावले आहे.

close