नाणेनिधीचे डॉमिनिक कान यांचा राजीनामा

May 19, 2011 2:42 PM0 commentsViews: 4

19 मे

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष डॉमिनिक स्ट्रॉस- कान यांनी अखेर त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली ते सध्या अटकेत असून त्यांचा जामीनही न्यायालयाने नाकारला आहे. बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत होता.

दरम्यान आता स्ट्रॉस यांच्या राजीनाम्यानंतर आएमएफ च्या नव्या अध्यक्षांच्या नावांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यात भारताच्यानियोजन आयोगाचे उपाध्यक्ष असलेले मॉटेंक सिंह अहलुवालिया यांचं नावं आघाडीवर आहे.

1945 पासून हे पद युरोपीय व्यक्तीकडे आहे. माँटेक सिंह यांनी याआधी आयएमएफच्या स्वतंत्र परिक्षण कार्यालयाच्या प्रथम संचालकपदाची जबाबदारी पार पाडली आहे.

या पदासाठी वयोमर्यादा 64 वर्षाची आहे. सध्या मॉटेंक सिंग यांचं वय 67 आहे. मात्र ही अट सदस्य देशांच्या बहुमताने वगळली जाण्याची तरतूद आहे. याशिवाय इंग्लडचे माजी पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन, तुर्कीचे केर्मल देरवी, फ्रांसच्या ख्रिस्टिन लेगार्ड, दक्षिण आफ्रिकेचे ट्रेव्हर मॅन्यूअल, इस्त्रायलचे स्टँन्ले फिशर, हारिहिको कुरोडा, अँजेला गुरा यांचीही नावं अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत.

close