पांगिराचं थाटात प्रिमिअर

May 19, 2011 1:20 PM0 commentsViews: 5

19 मे

विश्‍वास पाटील यांच्या बहुचर्चित पांगिरा या कादंबरीवर बेतलेल्या राजीव पाटील दिग्दर्शित पांगिरा या सिनेमाचा प्रिम्रिअर नुकताच मुंबईत पार पडला. या प्रिमिअरला लेखक विश्वास पाटील, दिग्दर्शक राजीव पाटील ,सिनेमाची संपूर्ण कलाकार मंडळी उपस्थित होती.

त्याचबरोबर कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, कांचन अधिकारी यांनी या प्रिमिअरला विशेष हजेरी लावली होती. राजीव पाटील यांचा पांगिरा हा सिनेमा येत्या शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. उपेंद्र लिमये, चिन्मय मांडलेकर, किशोर कदम, मीता सावरकर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

close