पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यात यावा – नाना पाटेकर

May 19, 2011 1:32 PM0 commentsViews: 8

19 मे

पोलिसांच्या घरांचा प्रश्न तातडीनं सोडवण्यात यावा अशी मागणी अभिनेते नाना पाटेकर यांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याकडे केली आहे. यापुढे फक्त कार्यक्रमासाठी नाही तर मदतीसाठी बोलवा असं ही नाना पाटेकर यांनी सांगितले.

डोंबिवलीत महात्मा गांधी तंटामुक्ती गाव योजनेच्या मार्गदर्शन परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गृहमंत्री आर.आर.पाटील आणि नाना पाटेकर यांची उपस्थित होती.

यावेळी नाना पाटेकर यांनी खाकी वर्दीतल्या देवमाणसाबद्दल आपल्याला नेहमीच आदर वाटतो असंही मत ही व्यक्त केलं. तसेच आर.आर.पाटील यांचंही कौतुक केलं. नानाच्या या मागणीकडे पोलिसांच्या घराचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी यावेळी दिलं.

close