कॉमनवेल्थ घोटाळा : कलमाडींसह 8 जणांवर सीबीआयचं आरोपपत्र

May 20, 2011 2:21 PM0 commentsViews: 3

20 मे, दिल्ली

कॉमनवेल्थ समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यावर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. टाईम स्कोअरिंग मशीन्स घोटाळ्याप्रकरणी कलमाडी यांच्यासह इतर 9 जणांवर सीबीआयनं चार्जशीट दाखल केलीय. त्यात गुन्हेगारी कट, फसवणूक, आणि भ्रष्टाचारविरोधी कलमाखाली आरोप ठेवण्यात आलेत. ही साठ पानांची चार्जशीट आहे. एकेआर कन्स्ट्रक्शन्स आणि स्वीस टाईमिंग कंपनीचं नावही त्यात आहे. कलमाडी यांच्यासोबत ललित भानोत, जयचंद्रन, सुजित लाल. व्ही. के. वर्मा, अनिल मदान, ए. के. रेड्डी आणि पुरुषोत्तम आर्य यांची नावं या चार्जशीटमध्ये आहेत.

close