शेतकर्‍यांवर पोलिसांचा अत्याचार लज्जास्पद – सोनिया गांधी

May 19, 2011 1:47 PM0 commentsViews: 4

19 मे

उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री मायावती विरुद्ध काँग्रेसमधला संघर्ष शिगेला पोहचला आहे. वाराणसीत झालेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मायावती सरकरावर हल्लाबोल केला.

नोएडातल्या भट्टा-पारसौल गावात झालेल्या हिंसाचारावरून सोनियांनी त्यांना धारेवर धरलं. भूसंपादन विरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर पोलिसांनी केलेला अत्याचार लज्जास्पद असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या. उत्तर प्रदेशात प्रशासनाचे अस्तित्वच नाहीसं झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुनही सोनियांनी मायावतींना फटकारले.

close