देशाची नाचक्की झाल्याची चिदंबरम यांची कबुली

May 21, 2011 3:27 PM0 commentsViews: 3

21 मे, दिल्ली

मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांच्या यादीतल्या घोळामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झालीय, अशी कबुली केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली. सीएनएन-आयबीएनला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते. पाकिस्तानला दिलेल्या यादीतली चूक खरोखरच गंभीर आहे, असं त्यांनी मान्य केलं. पण त्यासाठी दिलगिरी व्यक्त करण्याची गरज नाही, असं ते म्हणाले. या यादीतले आरोपी वजहुल आणि फिरोज अब्दुल रशिद हे भारतात असून देखील त्यांची नावं मोस्ट वॉन्टेड यादीत असल्याचं स्पष्ट झालं होतं. ही यादी आता CBI ने आपल्या वेबसाईटवरून काढून टाकलीय.

close