माथेरान झालं 161 वर्षांचं

May 22, 2011 7:59 AM0 commentsViews: 8

22 मे,

माथेरान 161 वर्षांचं झालंय. म्हणजे अर्थातच त्याचा शोध लागल्यापासून. या निमित्तानं माथेरानच्या नागरिकांनी आणि पर्यटकांनी माथेरानचा वाढदिवस साजरा केला. ब्रिटीशकाळातील ठाण्याचे कलेक्टर ह्युज पॉएंज मॅलेट यांनी 21 मे 1850 ला माथेरानचा शोध लावला. तेव्हापासून आजपर्यंत देशातलं प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून माथेरानचा नावलौकीक आहे. वाढदिवसानिमित्त माथेरानमधे खास पाच दिवसांच्या पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. पाच दिवस चालणा-या या महोत्सवात शोभायात्रा,चित्रकला प्रदर्शन, माथेरान परिसरात सापडणा•या सापांच्या फोटोंचं प्रदर्शन, माथेरानच्या इतिहासाची माहीती देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मनोरंजनाच्या कार्यक्रमांबरोबरच जंगल ट्रेकींग, व्हॅलीक्रॉसिंग, अश्व शर्यतींचा थरारक अनुभवही पर्यटकांना घेता येणार आहे.

close