तालिबानचा म्होरक्या मुल्ला ओमर ठार ?

May 23, 2011 7:36 AM0 commentsViews: 3

23 मे

अफगाणिस्तानातील तालिबानचा म्होरक्या मुल्ला ओमर ठार झाल्याचं वृत्त आहे. अफगणिस्तानातल्या टोलो टिव्हीनं हे वृत्त दिले आहे. ओमर पाकिस्तानमध्ये मारला गेल्याचं या वाहिनीनं सांगितलं आहे. पण तालिबानने ओमरच्या मृत्यूच्या बातमीचा इन्कार केला आहे.मुल्ला ओमर तालिबानचा प्रमुख आहे.

अल कायदाचा प्रमुख बिन लादेन याला मुल्ला ओमरनच आश्रय दिला होता. क्वेट्टाहून वजिरीस्तानला जात असताना ओमर मारला गेल्याचं वृत्त आहे. पण मुल्ला ओमर जिवंत असल्याचं तालिबानचं म्हणणं आहे. दरम्यान वजिरीस्तानमध्ये एक मृतदेह सापडला असून तो मुल्ला ओमर याचाच आहे का याबाबत डीएनए टेस्ट सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

close