पाकमध्ये दहशतवादी हल्ला सुरूच ; 13 अधिकार्‍यांचा मृत्यू

May 23, 2011 7:45 AM0 commentsViews: 8

23 मे

ओसामा बिन लादेनची हत्या झाल्यानंतर पाकिस्तानात नौदलाच्या एअरबेसवर सगळ्यात मोठा हल्ला झाला. कराचीमधल्या पीएनएस मेहरान नेव्हल बेसवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात नौदलाच्या 13 अधिकार्‍यांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जण जखमी झाले आहेत.

या हल्ल्यात पाकिस्तानी लढाऊ विमानही पाडण्यात आली आहे. रविवारी रात्री 10 दहशतवाद्यांनी रॉकेट्स स्फोटक आणि शस्त्रास्त्रांसह या ठिकाणी हल्ला केला. यावेळी त्यांनी दोन विमानही उडवून दिली. रात्री पावणे अकराच्या सुमारास हा हल्ला झाला. 10 अतिरेक्यांनी हा हल्ला केला आहे.

आतापर्यंत चकमकीत चार अतिरेकी ठार झालेत. तर 4 अतिरेक्यांना ताब्यात घेण्यात यश मिळालं आहे. जवळपास 27 बॉम्बस्फोट या ठिकाणी झाले असून अजूनही बिल्डिंगमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांशी सुरक्षा यंत्रणांची चकमक सुरू आहे.

दरम्यान तेहरिक ऐ पाकिस्तान आणि बलूच इथल्या फुटीरवाद्यांनी या हल्याची जबाबदारी स्विकारल्याचे वृत्त डॉन या दैनिकात देण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या कराचीमधल्या नेव्हल बेसमध्ये असलेलं P3 – ORION ही विमानं दहशतवाद्यांचं मुख्य टार्गेट होतं. त्यासाठी त्यांनी नेव्हल बेसवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी यातली दोन विमान पूर्णपणे नष्ट केली आहे.

close