आदर्श प्रकरणी 3 माजी मुख्यमंत्र्यांना प्रतिज्ञापत्रासाठी मुदत वाढ

May 23, 2011 8:01 AM0 commentsViews: 4

23 मे

वादग्रस्त आदर्श सोसायटी घोटाळ्याबद्दलची सुनावणी आता सुरू झाली आहे. आज राज्याचे तीन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण यांना प्रतिज्ञापत्र सादर करायचं होतं.

पण ब्रिगेडियर दीपक सक्सेना यांच्या प्रतिज्ञापत्रावरचा युक्तीवाद लाबल्याने आता राज्याचे हे तिन्ही माजी मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे तत्कालीन राज्यमंत्री आणि सध्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता त्यांना 26 तारखेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.

आदर्श सोसायटीचे प्रमोटर बरोबरच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनासुध्दा सीबीआयने या घोटाळ्यासाठी जबाबदार धरले आहे. सीबीआयच्या आरोपपत्रात 13 वे आरोपी असलेल्या अशोक चव्हाण यांच्यावर कट रचणे आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- तत्कालीन महसूलमंत्री म्हणून अशोक चव्हाणांनी 2002मध्ये आदर्शमध्ये 40 टक्के बिगर लष्करी म्हणजेच नागरी लोकांना फ्लॅट्स देण्याची शिफारस केली.- अशोक चव्हाणांनी पदाचा गैरवापर केला आणि नातेवाईकांना फ्लॅट्स दिले.- जुलै 2009 मध्ये मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाणांनी आदर्श सोसायटीला 15 टक्के जागा करमणुकीच्या मैदानासाठी न राखण्याची सूट दिली.

close