सांगलीत पतंगराव कदम यांच्या घरावर दगडफेक

November 11, 2008 5:46 AM0 commentsViews: 3

11 नोव्हेंबर, सांगलीशेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी 10 नोव्हेंबरला रात्री उशीरा सहकारमंत्री पतंगराव कदम यांच्या सांगली इथल्या घरावर दगडफेक केली. दोन मोटरसायकलवरून आलेल्या चार कार्यकर्त्यांनी अचानक बंगल्यावर दगडफेक करायला सुरुवात केली. या दगडफेकीत गेटजवळचे दोन लॅम्प फुटले.उसाला 1800रुपयांचा भाव मिळावा यासाठी गेल्या 15 दिवसापासून शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरु केलं आहे. मात्र राज्य सरकारानं ही मागणी मान्य न केल्यामुळं शेतकरी संघटनेन ही दगडफेक केल्याची माहिती मिलाली आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

close