विनोद गोयंकासह पाच जणांचा तिहार कारागृहात मुक्काम वाढला

May 23, 2011 10:14 AM0 commentsViews: 4

23 मे

2 जी घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या पाच कॉर्पोरेट अधिकार्‍यांचा जामीनअर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला आहे. रिलायन्स एडीएजीचे गौतम दोषी, हरी नायर, सुरेंद्र पिपारा स्वान टेलिकॉमचे संचालक विनोद गोयंका आणि युनिटेक वायरलेस लिमिटेडचे एमडी संजय चंद्रा यांचा त्यात समावेश आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांचा तिहार कारागृहात मधील मुक्काम वाढला आहे. ते आता सुप्रीम कोर्टात जामीन अर्ज दाखल करू शकतात. गेल्या 20 एप्रिलपासून ते तुरुंगात आहेत.

close