वाळूमाफिया लष्करे खून प्रकरणात दोघांना अटक

May 23, 2011 10:42 AM0 commentsViews: 32

23 मे

अहमदनगर : नेवासा येथील वाळूमाफिया सुनिल उर्फ अण्णा लष्करे याच्या खून प्रकरणात औरंगाबाद पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मुन्ना पठाण आणि मुन्ना जहांगीरदार या दोघा शार्पशुटर मामा भाच्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

औरंगाबादच्या नगरनाक्याजवळ अण्णा लष्करे याला बुधवारी रात्री साडे नऊ वाजता भररस्त्यावर गोळ्या घालून ठार मारण्यात आलं होतं. या घटनेमुळे वाळूमाफियांमधील टोळीयुध्दाची भीती पोलिसांना होती.

कारण या प्रकरणातील आरोपींना पोलिसांसोबतच अण्णा लष्करेचे समर्थकही शोधत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या खुनामागे आर्थिक हितसंबंधासोबतच आणखी काय कारण आहे ? याचाही पोलीस शोध घेत आहेत.

close