गौतम गंभीरची कर्णधार इंनिग

May 23, 2011 3:05 PM0 commentsViews: 1

23 मे

आयपीएलमधील खेळाडूंची कामगिरी नॅशनल टीम निवडताना कितपत विचारात घ्यायची यावर नेहमीच चर्चा रंगते. गौतम गंभीरचे भारतीय टीममधील स्थान पक्कं आहे. पण या आयपीएलमुळे कॅप्टन म्हणूनही गंभीर नावारुपाला आला आहे. भारतीय टीमसाठीही त्याला कॅप्टन इन मेकिंग म्हटलं जातंय.

गेली तीन वर्ष शाहरूखला मैदानाबाहेर बसून हताशपणे मॅचपाहणे नशीबी होतं. कारण त्याच्या मालकीची कोलकाता नाईट राईडर्स टीम कधीच बाद फेरी गाठू शकली नव्हती. अन यंदा गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता टीम हे अपयश पुसून काढण्यास सज्ज झाली आहे. कारण गंभीरने या टीममध्ये नवी जान आणली.

आणि हो आपल्या खेळाडूंच्या मागे तो खंबीरपणे उभा आहे.याबद्दल गंभीर म्हणतो, आम्हाला विश्वास होता की जर आम्ही संपूर्ण क्षमतेनं खेळलो तर कुठल्याही टीमला आम्हाल पराभूत करणे अवघड नाही. कारण या टीममध्ये खूप टॅलेंट आहे.

कोलकाता टीमची धूरा संभाळल्यानंतर गंभीरला लगेचचं धोणीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारायचीय. आणि त्याचं पहिलं मिशन असणार आहे विंडीज विरुध्दची वन डे सीरीज. विशेष म्हणजे या दौर्‍यात त्याला युवा खेळाडूंबरोबर सीनियर्सचाही सपोर्ट मिळतोय.

युवराज सिंग म्हणतो,गौतमची ही नवी इनिंग आहे. त्यानंतर धोणीही टीमला येऊन मिळेल पण जेव्हा तुम्ही टीमचं नेतृत्व करता तेव्हा टीममधील कच्च दुवे आणि बलस्थान कळतात.

गंभीरने याआधीही टीम इंडियाचे यशस्वी नेतृत्व केलं आहे. गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलँडला 5-0 असा व्हाईट वॉश द्यावा लागला होता. विशेष म्हणजे हा विजय सीनियर प्लेअर्सच्या अनुपस्थित मिळवला होता. रणजी टीममध्येही गंभीरच्या नेतृत्वाखालील दिल्लीने फायनलमध्ये धडक दिली होती. एकुणचं गंभीरचा प्रवास योग्य दिशेनं सुरु आहे इतकं नक्की.

close