अकोला महापालिकेत शिवसैनिकांचा राडा

May 23, 2011 11:06 AM0 commentsViews: 3

23 मे

अकोला महापालिकेची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. याचवेळी शिवसेनेच्या वतीने महापालिका बरखास्त करण्याच्या मागणीसाठी मोर्चा आणला होता.

शिवसैनिकांनी महापालिकेच्या आत घुसण्याचा प्रयत्न करत महापालिकेला टाळं ठोकण्याचाही प्रयत्न केला. तर मोर्चातील आंदोलकांनी पोलिसांवर टोमॅटो फेकले.

त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. या दरम्यान सेनेच्या काही नगरसेवकांनी पालिकेच्या सभागृहात घुसून खुर्च्यांची तोडफोड सुरु केली. या तोडफोडीमुळे सर्वसाधारण सभा अर्ध्या तासाकरता रद्द करावी लागली.

close