चंद्रपूरमध्ये बिल्डींगवरुन पडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, 4 जखमी

November 11, 2008 10:07 AM0 commentsViews: 5

11 नोव्हेंबर, वरोरा राजेश चौबे चंद्रपूरमधील वरोरा शासकीय आयटीआयच्या बिल्डींगवरुन 6 विद्यार्थी पडल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन विद्यार्थी ठार झाले असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तीन प्राध्यपकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंआहे. जखमी विद्यार्थ्यांना चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांची नावं प्रवीण मेश्राम आणि अमोल कुंकलवार आहेत. जेवणाच्या सुट्टीदरम्यान शिक्षकांनी काम सांगितल्यानं हे विद्यार्थी बिल्डिंगच्या गच्चीवर गेले होते. या बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं,त्यामुळे कच्चा बांधकामाच्या जागेवरुन हे विद्यार्थी खाली पडले, असं प्राथमिक तपासात समोर आलं. जखमी झालेल्या चार विद्यार्थ्यांना चंद्रपूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांना वेळेत मदत न मिळाल्यानं सर्वपक्षीय नेत्यांनी आणि संतप्त विद्यार्थ्यांनी नागपूर-नाका चौक इथं रास्ता रोको केला. दरम्यान,संबंधित शिक्षकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.

close